७ मेपर्यंत तिहार तुरुंगातच असणार मुक्काम
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल, भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता व चनप्रीत सिंग यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मेपर्यंत वाढ केली आहे. 14 days extension in judicial custody of Kejriwal and K. Kavita
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी तिघांच्याही कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अशाप्रकारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात राहणार आहेत. कविता यांनाही तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित असलेल्या सीबीआय प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. केजरीवाल, कविता आणि चनप्रीत यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. अरविंद केजरीवाल यांना गेल्या महिन्यात २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. तसेच, केजरीवाल यांच्या अटकेच्या एक आठवडा आधी ईडीने कविता यांना हैदराबादमधून 15 मार्च रोजी अटक केली होती. त्याचदिवशी चनप्रीतला अटक करण्यात आली होती.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर इन्सुलिनचे इंजेक्शन देण्यात आले आहे. ईडीच्या अटकेनंतर प्रथमच त्यांना इन्सुलिन देण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या साखरेची पातळी सातत्याने वाढत असल्याचा दावा केला जात होता. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची साखरेची पातळी 320 वर पोहोचली होती, त्यानंतर त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन देण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App