मेक इन इंडियाचा इम्पॅक्ट; 100000 कोटींची संरक्षण सामग्री भारतातच बनविल्याचा अभिमान!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची सुरुवात आपल्या पहिल्या कार्यकाळात केली आणि त्यासाठी प्रामुख्याने संरक्षण क्षेत्र निवडले. याचा परिणाम आता दिसला आहे भारतात तब्बल 1 लाख कोटी रुपयांची संरक्षण सामग्री तयार झाली आहे. गेल्या 70 – 75 वर्षांमध्ये भारत संरक्षण साहित्य आणि सामग्री आयात करणारा देश होता, पण आता तो निर्यात करणारा देश बनला आहे आणि 2022 – 23 मध्ये 16000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री भारताने निर्यात केली आहे. 100,000 crore worth of defense material is proud to be made in India

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भातली आकडेवारी दिली. भारतात संरक्षण सामग्री बनविण्याची मुभा खासगी क्षेत्राला द्यावी, अशी मागणी शंतनुराव किर्लोस्करांच्या अध्यक्षतेखाली उद्योगपतींची संघटना फिक्की आणि सीआयआय यांनी 1988 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे केली होती. परंतु त्यावेळी खासगी क्षेत्राला तशी परवानगी मिळाली नाही. राजीव गांधी सरकारने आणि त्यानंतरच्या अनेक सरकारांनी संरक्षण साहित्य उत्पादन सरकारी क्षेत्रात ठेवून ते खूप मर्यादित राखले.

पण संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात खासगी क्षेत्राला मेक इन इंडियाच्या धोरणाच्या रूपाने प्रवेश मिळाला आणि अवघ्या 4 वर्षांमध्ये त्याचा खरा इम्फॅक्ट दिसला आणि संरक्षण साहित्य निर्मिती भारतातच तब्बल 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. सैनिकांसाठी वापरायच्या वस्तूंपासून क्षेपणास्त्रे, रणगाडे, चिलखती वाहने ते फायटर जेट यांचा समावेश आहे.

2023 – 24 मध्ये संरक्षण साहित्याची निर्यात 25000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. भारत निर्यात करत असलेल्या संरक्षण सामग्री मध्ये सैनिकांच्या वापरातल्या वस्तूंबरोबरच मोठ्या संहारक मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांपर्यंतच्या संरक्षण साहित्याचा समावेश आहे.

100000 crore worth of defense material is proud to be made in India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात