सनातन वादामुळे ‘I.N.D.I.A’ आघाडी बॅकफूटवर?, भोपाळमध्ये होणारी पहिली संयुक्त रॅली रद्द!


मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  कमलनाथ यांनी दिली आहे माहिती

विशेष प्रतिनिधी

भोपाळ  : मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कमलनाथ यांच्यासारखे अनेक काँग्रेस नेते निवडणुकीपूर्वी ‘कट्टर हिंदुत्वा’च्या मार्गावर आहेत. मात्र, सनातन धर्माच्या वादानंतर पेच निर्माण झालेल्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची भोपाळमध्ये होणारी पहिली संयुक्त रॅली रद्द करण्यात आली आहे. INDIA lead on backfoot due to Sanatan controversy First joint rally to be held in Bhopal cancelled

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्य काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ म्हणाले की, दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांचा समावेश असलेली ‘I-N-D-I-A’ आघाडीची मध्य प्रदेशातील पहिली संयुक्त सार्वजनिक बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यातील इंडिया आघाडीच्या रॅलीबाबत विचारले असता कमलनाथ म्हणाले, ‘रॅली होणार नाही. ती रद्द करण्यात आली आहे.

‘I-N-D-I-A’ आघाडीने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ घातलेले राज्य मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आपली पहिली सार्वजिनक बैठक  घेण्याचा निर्णय घेतला होता आणि सांगितले होते की घटक पक्ष जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर सुरू करतील.

इंडिया समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात सांगण्यात आले होते की, ‘समितीने देशाच्या विविध भागात संयुक्त सार्वजनिक बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि भाजपा सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवरची पहिली सार्वजनिक बैठक  ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होणार आहे.

INDIA lead on backfoot due to Sanatan controversy First joint rally to be held in Bhopal cancelled

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात