मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देत, केवळ आश्वासनं देणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना निमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा देत, एक आवाहनही केलं आहे. याशिवाय आतापर्यंत मराठवाड्यातील जनतेला राज्य सरकारकडून किंवा सत्तेत असलेल्या नेते मंडळींकडून दिल्या गेलेल्या आश्वासनावरूनही निशाणा साधला आहे. तसेच, पाणी प्रश्नावरून जनतेने जागरूक होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. MNS President Raj Thackeray extended his greetings on the occasion of Marathwada Liberation Day
राज ठाकरे म्हणतात, ”आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.”
याचबरोबर ”पण हे करताना फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि ह्यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं ह्याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे. तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता ह्याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे.” असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
याशिवाय ”मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा.” असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील जनतेला आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App