जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत आणि काय केली आहे मोठी घोषणा First reaction of Prashant Kishor on Lok Sabha election results
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जन सुराज अभियानाचे शिल्पकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता जागांबाबत कोणतेही मूल्यांकन करणार नसल्याचे जाहीर केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही घोषणा केली. वास्तविक, प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजपला 280 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. या निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, ते पुन्हा कधीही आकड्यांच्या खेळात पडणार नाहीत. ‘नंबर चुकले हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही.’ असंही त्यांनी सांगितलं.
प्रशांत किशोर हे संपूर्ण देशात राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक निवडणुकांबाबत भाकीत केले होते, जे बऱ्याच अंशी खरे ठरले आहेत. यंदाही लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी मोठे भाकीत केले होते. या निवडणुकीबाबत भाकिते करून ते संपूर्ण देशाच्या चर्चेत आले होते. एनडीएबाबत ते म्हणाले होते की, आकडा 300 ओलांडू शकतो, पण निकाल वेगळा लागला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App