विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी अध्यक्ष राहूल गांधी प्रचाराला आले की कॉँग्रेसवाल्यांच्या पोटात गोळा येतो. कारण राहूल गांधी यांच्या ज्या ठिकाणी सभा होतात तेथे कॉँग्रेसचा पराभव होतो. एका टीव्ही शोमध्ये भाजपाच्या प्रवक्तयाने याच भावा गाण्यातून मांडल्या आणि कॉँग्रेसवाल्यांनाही हसू आवरेनासे झाले.Nehru said that such a grandson will come from Indira, he will campaign for Congress and BJP to win, even the Congressmen will laugh at the song of BJP spokesperson
आजतकवरील लाइव्ह टीव्ही डिबेटमध्ये, भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. ते म्हणाले, नेहरू जी कह गए इंदिरा से ऐसा पोता आएगा, कैम्पेन करेगा कांग्रेस की और भाजपा को जितवाएगा. भाटियांचं हे गाणं ऐकून काँग्रेसचे प्रवक्तेही हसू लागले.
यूपी निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. त्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यावर आहेत. सोनिया आणि राहुल गांधी किती वेळा रायबरेली आणि अमेठीला भेट देतात, असा सवाल करत आता राज्यात निवडणूक असल्याने दोघेही भेट देत असल्याचा आरोप भाजपा नेत्याने केला.
काँग्रेस प्रवक्त्यांनी आरोप केला की युपीमधील सत्ताधारी भाजपाने कोरोनाच्या काळात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही, त्यांचे मंत्री शेतकऱ्यांना वाहनांनी चिरडतात, तरीही भाजपा अशा मंत्र्याच्या बचावात उतरतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App