यूपी निवडणूक सेमीफायनल नव्हे, लोकसभेवर परिणाम नाही; प्रशांत किशोरांचा खरा निष्कर्ष की ममतांचे नॅरेटिव्ह सेटिंग??


उत्तर प्रदेशची 2022 मधली विधानसभा निवडणूक ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल नाही. या दोन स्वतंत्र निवडणुका आहेत. त्यांचे निकाल वेगवेगळे लागू शकतात, असा निष्कर्ष निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काढला आहे. या संदर्भात इंडिया टुडेने त्यांच्या मुलाखतीची बातमी केली आहे.UP election is not a semifinal, no effect on Lok Sabha; The real conclusion of Prashant Kishor or Mamata’s narrative setting

अर्थात प्रशांत किशोर यांचा हा निष्कर्ष आणि वक्तव्य नवे नाही. या आधी एकदा त्यांनी हेच वक्तव्य आणि हा निष्कर्ष प्रसृत केला आहे. परंतु प्रशांत किशोर यांचा हा निष्कर्ष खरा आहे की हे ममता बॅनर्जी यांचे नॅरेटिव्ह आहे याविषयी गडद शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. कारण प्रशांत किशोर हे आता रणनीतीकार असण्यापेक्षा राजकीय नेता अधिक झाल्याचे दिसून येत आहे.



याची दोन-तीन कारणे आहेत. निवडणुकीचे भाकीत करताना किंवा कोणताही निष्कर्ष काढताना जी तटस्थ भूमिका असावी लागते ती प्रशांत किशोर यांची उरलेली दिसत नाही. कारण तटस्थ भूमिकेतून तुम्ही निष्कर्ष काढताना तो कोणाच्या बाजूने अनैसर्गिकरित्या झुकलेला असत नाही. त्यात तुमचा नॅरेटिव्ह देखील डोकावताना दिसत नाही. प्रशांत किशोर यांनी आहे वर जो निष्कर्ष काढला आहे, त्यात तटस्थता कमी आणि नॅरेटिव्ह सेटिंग अधिक वाटते आहे.

उदाहरणच द्यायचे झाले, तर फक्त प्रशांत किशोर यांनीच नव्हे, तर विविध वृत्तवाहिन्यांनी उत्तर प्रदेशात भाजप विधानसभेची निवडणूक जिंकेल. समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असेल. बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांची वाताहत झालेली असेल, असे सुरुवातीचे मतचाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. याचा अर्थ असा की भाजप उत्तर प्रदेशात बहुमताने जिंकणार आहे. अशा स्थितीत त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर अनुकुल होतील,

से निष्कर्ष भाजप समर्थकांनी काढले तर ते फारसे गैर मानता येणार नाही. पण इथेच नेमकी प्रशांत किशोर यांना मेख मारून ठेवायची आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेश जिंकला तरी लोकसभा निवडणूक ही “लेव्हल प्लेइंग फिल्ड” असेल असे प्रशांत किशोर यांना सर्व विरोधकांना देखील सुचवायचे आहे. कारण विरोधकांचे मनोधैर्य खचणे हे ममता बॅनर्जी यांच्यासाठी धोकादायक आहे आणि ते प्रशांत किशोर यांना होऊ द्यायचे नाहीए. ही त्यातली खरी राजकीय मेख आहे.

यासाठी प्रशांत किशोर यांनी 2012 च्या विधानसभा निवडणुकीचा आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला आहे. 2012 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा चौथ्या क्रमांकावर होता. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने निवडून आला. वरवर पाहता प्रशांत किशोर यांनी दिलेला हा राजकीय तर्क अतिशय योग्य वाटतो. पण या तर्कातला मूलभूत गाभा मात्र फसवा आहे.

एक तर 2012 आणि 2014 च्या निवडणुकीत महत्त्वाचा फरक हा होता की नरेंद्र मोदी हा “फॅक्टर” 2012 पर्यंत भाजपमध्ये डेव्हलप झालेला नव्हता. 2012 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर हा “फॅक्टर” डेव्हलप झाला आहे आणि त्याचे पडसाद आणि परिणाम 2014 च्या निवडणुकीत मिळण्यासाठी भाजपने संपूर्ण दीड वर्षांमध्ये जीवाचे रान केले आहे. त्यावेळी केंद्रात युपीएचे दोन टर्म पूर्ण केलेले सरकार होते. अ प्रस्थापित सरकार विरोधात मत हा सर्वात मोठा फॅक्टर होता. हे प्रशांत किशोर सोईस्कर रित्या बाजूला ठेवत आहेत. त्यावेळी प्रशांत किशोर हे भाजपबरोबर होते हे इथे विसरून चालणार नाही.

2022 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप इथे दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर आहे. भाजपची 2012 आणि 2022 मधली ताकद यामध्ये मूलभूत फरक आहे, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकार हे दोन टर्म पूर्ण केलेले सरकार असेल पण या सरकारच्या बाजूने असणारी राजकीय फौज 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने असलेल्या फौजेपेक्षा कितीतरी मोठी आहे, हेही विसरता कामा नये.

त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर यामध्ये दिसतो आहे, तो म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरुद्ध दोन प्रबळ नेतृत्वांमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. एक काँग्रेसचे नेतृत्व असेल आणि दुसरे ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व असेल. म्हणजे मोदींची स्पर्धा ही राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या बरोबर समांतर असणार आहे आणि इथेच प्रशांत किशोर यांचा निष्कर्ष ममता बॅनर्जी यांच्या बाजूने चुकला आहे, असे दिसून येते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे भाजप जिंकण्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाहीत, असे म्हणण्याचा अर्थ बाकीच्या विरोधी पक्षांचे मनोधैर्य वाढविण्याचा किंवा टिकवून धरण्याचा हा प्रकार आहे असे मानावे लागेल.

प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत आहेत, हे उघड आहे. त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर कितीही आपण ममता बॅनर्जी यांच्यापासून बाजूला झाल्याचे सांगितले असले तरी ज्या पद्धतीने ते काँग्रेसच्या विरोधात विशेषतः गांधी परिवाराच्या विरोधात विविध मुलाखती देऊन नॅरेटिव्ह सेट करीत आहेत, तै पाहता तो नॅरेटिव्ह हा ममता बॅनर्जी यांना अनुकूल ठरावा अशाच पद्धतीने ते बोलत आहेत. ममता बॅनर्जी यांना विरोधकांचे मुख्य नेतृत्व या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पातळीवर सेट करण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत.

त्यामुळेच जे उघड निष्कर्ष विविध वृत्तवाहिन्यांनी काढले आहेत, की उत्तर प्रदेशात भाजपची जिंकेल तो निष्कर्ष वेगळ्या पद्धतीने 2024 च्या दिशेने वळविण्याचे काम प्रशांत किशोर यांनी चलाखीने विविध वृत्त वाहिन्यांना मुलाखती देऊन चालविले आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर हे आता तटस्थ निरीक्षक न राहता ममता बॅनर्जी यांच्या बाजूने नॅरेटिव्ह सेट करणारे निरीक्षक बनल्याचे दिसून येत आहे.

UP election is not a semifinal, no effect on Lok Sabha; The real conclusion of Prashant Kishor or Mamata’s narrative setting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात