जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक : आज निकाल !धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दिमाखात विजय


राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.


धुळे जिल्ह्यात गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे विजयी झाल्या आहेत. तर, नंदुरबारमध्ये हिना गावित यांची बहिण सुप्रिया गावित विजयी झाल्या आहेत. Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections: Results today! Chandrakant Patil’s victory in Dhule


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यापार्श्वभूमीवर आरक्षणामुळं कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्यात आणि किती कसं चित्र आहे, याचा आढावा घेणारा वृत्तांत…

नंदूरबारमध्ये मंत्री के. सी. पाडवी, भाजप खासदार हिना गावित, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित या कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. तर, धुळे जिल्ह्यात गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

किती जिल्हा परिषदेच्या जागांचा निकाल?

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

 • पालघर-15
 • नागपूर -16
 • धुळे – 15
 • नंदूरबार – 11
 • अकोला – 14
 • वाशिम -14

किती पंचायत समितीच्या जागांचा निकाल?

 • पालघर-14
 • नागपूर -31
 • धुळे -30
 • नंदूरबार -14
 • अकोला -28
 • वाशिम -27

अकोल्यातील चित्र कसं आहे?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका अकोला जिल्हा परिषदेच्या 14 ओबीसी गटातून विजयी झालेल्या सदस्यांना बसला आहे. तर पंचायत समितीच्या 28 ओबीसी सदस्यांनाही आपल पद गमवावं लागलं आहेय. यामुळे ५३ सदस्य संख्या असलेल्या अकोला जिल्हा परिषदेत 14 सदस्यांच्या पद गच्छंतीनंतर आता फक्त 39 सदस्य उरले आहेत. सदस्यत्व रद्द झालेल्या 14 पैकी 6 सदस्य वंचित बहुजन आघाडीचे आहेत. दोन वंचित पुरस्कृत अपक्ष, भाजपच्या सातपैकी तीन सदस्यांना पद गमवावं लागलं आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याला गमवावं लागलं.

नागपूर…

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी आणि 31 पंचायत समितीच्या जागांसाठी आज मतदान पार पडले. नागपूर जिल्ह्यात एकूण 60 टक्के मतदान झालं आहे. काँग्रेस पक्षाच्या 31 जागा होत्या. 7 रद्द झाल्या. विद्यमान 24 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा होत्या. 4 जागा रद्द झाल्या, तर सध्या 6 जागा आहेत. भाजपच्या 15 जागा होत्या. 4 रद्द झाल्या आहेत, तर सध्या 11 जागा आहेत. शिवसेनेची 1 जागा आहे. शेकापची 1 जागा होती, ती रद्द झाली. त्यामुळे शेकापच्या खात्यात एकही जागा नाही.धुळे…

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. 14 गट व 28 गणांसाठी मतदान झालं असून, धुळे जिल्हा परिषदेवर भाजपशी सत्ता होती. एकूण 56 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपकडे सध्या 27 जागा आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजपच्या उमेदवारांना आहे.

नंदुरबार…

जिल्ह्यात परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नंदुरबार तालुक्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. शहादा तालुक्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. तर तिकडे भाजपने युती करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रंगत ही वाढणार आहे.

वाशिम जिल्ह्यात काय असेल चित्र?

वाशीम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समित्यांच्या 27 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झालं आहे. जिल्हा परिषदवर महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र पोटनिवडणुकीत एकमत न झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असल्याने आता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचं चित्र आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढणार असून, वंचित आणि जनविकास आघाडी यांची युती झाली आहे.

Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections: Results today! Chandrakant Patil’s victory in Dhule

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण