मंदिरांवर मोठे निर्बंध, पण शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी आग्रह


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात मंदिरांवर निर्बंध लावणारी शिवसेना स्वतःच्या दसरा मेळाव्यासाठी मात्र आग्रही दिसते आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तसे विधान केले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा होईल. तो ऑनलाइन असणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे- Sanjay raut on dasara melawa by shivsena

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊतांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज ते माध्यमांशी बोलत होते.

दरवर्षी होणारा शिवसेनेचा बहुचर्चित दसरा मेळावा गेल्या वर्षी करोनाच्या सावटाखाली पार पडला. यंदाही करोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा होणार, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. तसेच त्यांनी या मेळाव्याच्या स्वरुपाविषयीही वक्तव्य केले आहे. शिवसैनिकांमध्ये त्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण होणार हे निश्चित.

शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येईल.

– Sanjay raut on dasara melawa by shivsena

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण