महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू; खासदार संभाजीराजेंनी केली पाहणी; वाचा महामार्ग उभारणीचा इतिहास!!


प्रतिनिधी

रायगड : महाड ते दुर्गराज रायगड पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेले असून त्याची पाहणी आज राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन केली. या संदर्भातली छायाचित्रे आणि माहिती त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहेत. ती अशी :Work on Mahad to Raigad National Highway commenced at full capacity; MP Sambhaji Raje inspected; Read the history of highway construction

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून महाड ते दुर्गराज रायगड पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले आहे. महाडपासून दुर्गराज रायगडचा पायथा म्हणजेच चित्त दरवाजापर्यंत हा प्रशस्त महामार्ग साकारला जात आहे.



देशभरातून रायगडला येणारे शिवभक्त व पर्यटकांच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.- या महामार्गावरून जात असताना हा सर्वसामान्य महामार्ग नसून स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड कडे जाणारा महामार्ग आहे, याची प्रचिती येत राहावी यादृष्टीने ऐतिहासिक धाटणीचा हा मार्ग करण्यात येत आहे. या मार्गालगत प्रवाशांसाठी सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असतील. या माध्यमातून स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

महामार्ग उभारणीचा इतिहास काय?

संभाजीराजेंच्या मागणीनुसार ठेकेदार बदलला. महाड ते रायगड पायथा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गलथानपणा करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे काँन्ट्रँक्ट रद्द करण्यात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यश मिळवले.

संभाजीराजे हे रायगड प्राधिकारणाचे अध्यक्ष आहेत. ते रायगड किल्ला परिसराच्या विकासाच्या संदर्भाने दक्ष असतात. केंद्र, राज्य सरकारकडे ते सातत्याने पाठपुरावा करत होते.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गलथानपणा सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरून सर्व प्रक्रिया पूर्ण करून कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट करण्यात आले होते. त्याबरोबरच नवीन टेंडरही खुले करण्यात आले. 2020 मध्ये स्वत: संभाजीराजे यांनी टिवट करून ही माहिती दिली होती.

त्यावेळी संभाजी राजे म्हणाले होते, की रायगड संदर्भातील सर्व कामे सर्वोत्तम दर्जाची करून घेण्यासाठी मी सदैव आग्रही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत जाणारा महामार्ग ऐतिहासिक असावा ही माझी आणि सर्व शिवभक्तांची इच्छा आहे. तो तसाच करून घेऊ, असेही संभाजीराजे यांनी म्हटले होते. संभाजीराजे यांनी या निर्णयाबद्दल मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदनही केले.

Work on Mahad to Raigad National Highway commenced at full capacity; MP Sambhaji Raje inspected; Read the history of highway construction

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात