Nawab Malik ED : नवाब मलिकांचा पाय खोलात; बीकेसीत आढळला 200 कोटींचा भूखंड; उच्च न्यायालयानेही दिला दणका!!


प्रतिनिधी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहाराबाबत मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.200 crore plot found in BK; The High Court also gave a bang

नवाब मलिक यांच्या नावावर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी मध्ये तब्बल 200 कोटींचा भूखंड असल्याचे आढळून आले आहे. त्याच वेळी आज उच्च न्यायालयाने देखील नवाब मलिक यांना दणका दिला आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेले आरोप फेटाळण्याचा अर्ज नवाब मलिक यांनी केला होता.त्या अर्जावर आज सुनावणी घेऊन ते आरोप न्यायालयाने फेटाळले नाहीतच, उलट सुनावणी पुढच्या सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा मिळण्याऐवजी दणकाच मिळाला आहे.

ईडी कोठडीची मुदत वाढणार?

नवाब मलिक यांची ईडी कोठडीची मुदत उद्या 3 मार्च रोजी संपत आहे. त्यांना उद्या पी एएमएल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ईडीचे अधिकारी त्यांच्या कोठडीची मुदत आणखी वाढवून मागण्याची दाट शक्यता आहे. नवाब मलिक हे चौकशी आणि तपासात सहकार्य करत नाहीतच उलट अधिकाऱ्यांना धमकावत असल्याच्या तक्रारी देखील अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

नवाब मलिक पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी व विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी रद्द करण्यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर २ मार्च रोजी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

हायकोर्टात सोमवारी सुनावणी

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा करत, मलिक यांनी आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. मात्र मलिकांची तातडीने सुटका होणार नाही.

नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता. आता नवाब मलिकांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

200 crore plot found in BK; The High Court also gave a bang

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*