एका माणसासाठी उद्धव ठाकरेंनी अख्खी शिवसेना पणाला लावली, पण…; कृपाल तुमानेंचा टोला

प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका माणसासाठी अख्खा शिवसेना पक्ष पणाला लावला. पण अजुनही वेळ गेलेली नाही, असा टोला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला आहे. Why did Uddhav Thackeray risk the entire Shiv Sena for a man?

आमचे 40 आमदार आणि आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडा असे सांगत होतो. पण ते त्यासाठी तयार नव्हते. आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. त्यांनी एका माणसासाठी त्यांनी पक्ष पणाला लावला, असे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.


Uddhav Thackeray : 14 तारखेला तुंबलेले नाही, तर मनातले बोलणार; राज ठाकरेंना टोला!!; पण मुख्यमंत्री मोदींच्या वळणावर??


काय म्हणाले कृपाल तुमाने?

आज शिवसेनेची काय स्थिती आहे, हे सर्व जण पाहत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. आताही हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर चित्र बदलू शकते, असेही तुमाने यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत निवडणूक लढलो होतो आणि आता आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, असेही ते म्हणाले.

खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची हा वाद निवडणूक आयोगाच्या दरबारात पोहोचला असताना कृपाल तुमाने यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, हे उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेले वक्तव्य राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.

Why did Uddhav Thackeray risk the entire Shiv Sena for a man?

महत्वाच्या बातम्या