महापालिकेत ओबीसींसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत, नगरपालिका, जिल्हा परिषदांसाठी 28 जुलैला प्रक्रिया


प्रतिनिधी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतील इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक होऊ घातलेल्या महापालिकांसाठी येत्या २९ जुलैला तर जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांसाठी २८ जुलैला २०२२ रोजी ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढण्याचे आदेश शुक्रवारी दिले.reservation for OBCs in Municipal Corporation on July 29, process for Municipalities, Zilla Parishads on July 28

त्यानुसार सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नव्याने सोडत काढण्यात येईल. मुंबई महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार ओबीसींसाठी ६३ जागा राखीव असतील.



महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना यापूर्वीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे. ही प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेशात म्हटले आहे.

याशिवाय आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी २८ जुलैला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत निघेल. आरक्षणाची प्रारूप अधिसूचना २९ जुलै रोजी प्रसिद्ध करायची आहे. तर ५ ऑगस्ट २०२२ रोजी आरक्षण विहित नमुन्यात राजपत्रात प्रसिद्ध करावे, अशी सूचना आयोगाने केली आहे.

राज्यातील ११५ नगरपालिका आणि ९ नगर पंचायतींसाठी २८ जुलैला ओबीसींसाठी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित महापलिका, जिल्हा परिषदेत ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण मान्य केले आहे. मात्र समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाणार नाही या मर्यादेत ओबीसी प्रवर्गासाठी जगा राखून ठेवाव्यात असे आयोगाने स्पष्ट केले आहे. हा आदेश निघाल्याने पावसाळा संपल्यानंतर लगेच महापलिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होणार आहे.

या संस्थांसाठी निघणार सोडत

1. महापालिका : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, कोल्हापूर,पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर.

2. जिल्हा परिषदा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

reservation for OBCs in Municipal Corporation on July 29, process for Municipalities, Zilla Parishads on July 28

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात