आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा : शिवसैनिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील, गद्दारांना नव्हे, युवा सेनेचे 280 कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल

प्रतिनिधी

जळगाव/ मनमाड : शिवसेनेतील बंडाळीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी जळगाव युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी युवा सेनेच्या पदांचा राजीनामा दिला असून गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात काम करण्याचे जाहीर केले. या वेळी युवा सेनेचे ८० पदाधिकारी व २०० कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाल्याचा दावाही करण्यात आला. शिवराज पाटील हे एकटेच गेले आहेत. विराज कावडिया यांची युवा सेनेच्या उत्तर महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर युवा सेनेत वाद निर्माण झाला आहे.Aditya Thackeray’s Shiv Samvad Yatra I am bound to answer the question of Shiv Sainiks, not traitors, 280 Yuva Sena activists join Shinde Sena

सावंतांनी ग्रामपंचायत लढवावी – पाटील

गुलाबराव पाटील यांनी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. सावंत यांना बोलायला सोपे आहे. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये उभे राहावे. सोसायटीची निवडणूक लढली तरी नाकातून पाणी निघते.

मेळाव्यात आदित्य म्हणाले, गद्दारांकडे प्रश्न विचारायची हिंमत नाही. त्यांना अधिकार नाही. त्यांची लायकी नाही. त्यांची मान खालीच असल्याने त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे? उलट शिवसैनिकाने प्रश्न केला तर त्याला उत्तर द्यायला मी बांधील आहे.

मेळाव्यात आमदार कांदे म्हणाले, मला गद्दार म्हणू नका, आम्ही गद्दारी नव्हे तर उठाव केला. उद्धव साहेबांना वारंवार सांगूनही त्यांनी ऐकले नाही. रश्मी वहिनींनाही सांगितले, त्यांनीही अजिबात मनावर घेतले नाही. मी माझे काम केले, सांगा यात माझे काय चुकले?मतदार पाठीशी तर घाबरता कशाला : सावंत

आगामी काळात शिवसैनिक गद्दारांना जागा दाखवेल. त्यांनी आधी राजीनामा द्यावा आणि जनतेसमोर यावे, असे आव्हान संजय सावंत यांनी गुलाबरावांसह पाचही आमदारांना दिले. माजी आमदार सुरेश जैन यांनी अनेकदा पक्ष बदला. ते राजीनामा द्यायचे व निवडून यायचे. जर मतदार तुमचे असतील तर घाबरता कशाला.

मनमाडमध्ये आदित्य ठाकरेंचा संवाद, पण युवा सेनेचे 280 कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल

ठाकरे परिवार व शिवसेना संपवायला काही गदाधारी निघाले. याचे दुःख वाटते. ज्यांना भरभरून दिले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. मला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही. शिवसैनिकांनी विचारले तर मी उत्तर देण्यास बांधील आहे, गद्दारांना नाही असा घणाघात युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मनमाड येथे केला.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व नांदगावचे बंडखोर शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यामधील मनमाड येथील चांदवड रोडवर होणारा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ शुक्रवारी सकाळी मीडियाच्या पिक अवरमध्ये असतानाच अचानक पोलिसांनी त्याचा फ्यूज उडवला. ठाकरेंची गाडी आ. कांदेंच्या मेळाव्याच्या ठिकाणावरून दुसऱ्या मार्गे बायपासद्वारे मूळ जागी आली आणि या राजकीय शक्तिप्रदर्शन नाट्याचे अखेर निष्ठांवत व फुटीर अशी शकले उडाली आणि त्याचे रूपांतर मग दोन वेगवेगळ्या मेळाव्यांत झाले.
मनमाड येथे शुक्रवारी दुपारी नांदगावचे शिवसेना बंडखोर आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरे येथे आल्यानंतर निवेदन देऊन प्रश्नांची उत्तरे विचारणार होते. त्यामुळे मनमाड शहरात आज काहीतरी मोठा राजकीय भूकंप होणार अशी हवा सर्वच चॅनल व प्रसिद्धी माध्यमांतून आज सकाळीच भरण्यात आली. त्यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष मनमाडला काय होणार याकडे लागले.

नाशिक जिल्हा पोलिसांनाही नेमके काय होणार याची चाहूल लागली आणि एसपी सचिन पाटील यांच्यासह १० वरिष्ठ अधिकारी, १५० रॅपिड अॅक्शनमधील पोलिस अधिकाऱ्यांचा सशस्त्र बंदोबस्त मनमाडला दाखल झाला. बॅरिकेड्स लावण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले. दुपारी एकच्या सुमारास आदित्य ठाकरेंचे चांदवड रोडवरून आगमन होत असतानाच त्यांना मनमाड शहरात नवीन झालेल्या लासलगाव फाट्याजवळील गुरुद्वारा गेटने नेण्यात आले.

Aditya Thackeray’s Shiv Samvad Yatra I am bound to answer the question of Shiv Sainiks, not traitors, 280 Yuva Sena activists join Shinde Sena

महत्वाच्या बातम्या