केंद्राने ऑक्सिजन प्लॅँट उभे करण्यासाठी दिलेला निधी कोठे हडप झाला? भाजप आमदार प्रसाद लाड यांचा सवाल


केंद्र सरकारने पाच महिन्यांपूर्वीच राज्यासाठी 10 ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. या प्लांटसाठी पीएम केअर फंडातून निधीही देण्यात आला होता. पाच महिने झाले तरी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला नाही. या प्लांटचं काय झालं? हा निधी गेला कुठे? कोठे हडप झाला? असा सवाल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला केला आहे.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई: केंद्र सरकारने पाच महिन्यांपूर्वीच राज्यासाठी 10 ऑक्सिजन प्लांट मंजूर केले होते. या प्लांटसाठी पीएम केअर फंडातून निधीही देण्यात आला होता. पाच महिने झाले तरी ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला नाही. या प्लांटचं काय झालं? हा निधी गेला कुठे? कोठे हडप झाला? असा सवाल भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला केला आहे. Where did the funds given by the Center for setting up the oxygen plant go? Question from BJP MLA Prasad Lad

लाड म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये, प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2021मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठविली होती. त्यानुसार ह्यपीएम केअरह् निधीतून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला.



मात्र, गेल्या 4-5 महिन्यात या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरु केला नाही. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केंद्राने दिलेले अर्थसहाय्य व मुख्यमंत्री निधीत पडून असलेला पैसा यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले असते. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी लाड यांनी केली.

एका पोलीस अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्या या सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेला निधी खाऊन टाकला असा आरोप करत लाड म्हणाले की, घरात बसलेल्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठींही काहीही केले नाही. या नाकर्त्या सरकारमुळेच आज राज्यातल्या सामान्य जनतेचा बळी जात आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मागणीनुसार 10 दिवसात 4 लाख 35 हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्याला 1 लाख 65 हजार औषधे मिळाली आहेत. तसेच राज्य सरकारनेही विविध यंत्रणांच्या माध्यमातून 5 लाख औषधांची खरेदी केलेली आहे. तरीही सध्या राज्यात औषधांचा तुटवडा आहे. ही औषधं कुठे गायब झाली? या औषधांचा काळाबाजार झाला का? राज्य सरकारने या सर्व औषधांचा हिशोब द्यावा व जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

Where did the funds given by the Center for setting up the oxygen plant go? Question from BJP MLA Prasad Lad


महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती