ज्यांना पक्ष जोडता येत नाही ते देश काय जोडणार? : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका


प्रतिनिधी

सातारा : ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोल आठवलेंनी केला आहे.What will join the country that cannot join the party? : Union Minister Ramdas Athawale’s criticism of Rahul Gandhi

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे काल संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील कराड येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल, असा टोला आठवलेंनी विरोधकांना मारला.

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याचे रामदास आठवले म्हणाले.

केंद्रीय मंत्री आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी येणार असून शरद पवारांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. बारामती मतदार संघात भाजपची हवा असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

What will join the country that cannot join the party? : Union Minister Ramdas Athawale’s criticism of Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात