प्रतिनिधी
मुंबई : अँटीलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुखांनी शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आपल्याकडे दोन कोटी रुपये मागितल्याचा दावा ईडीच्या चौकशीत केला आहे. असा दावा त्याने पूर्वीही केला आहे.Waze’s ED claims that Deshmukh demanded Rs 2 crore for Pawar’s favor; The names of Palande, Parab and Karmate were also taken
त्याच बरोबर मुंबईतल्या दहा डीसीपीच्या बदल्या रोखण्यासाठी अनिल देशमुख आणि अनिल परब या दोन मंत्र्यांनी 20 – 20 कोटी रुपये घेतले, असा दावाही सचिन वाझे याने केला आहे.
संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतलेले 40 कोटी रुपये यापैकी 20 कोटी रुपये संजीव पलांडेने अनिल देशमुख यांना दिले, तर आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे याने 20 कोटी रुपये अनिल परब यांना दिले, असा दावा आहे सचिन वाजे यांनी ईडीच्या चौकशीत केला आहे.
सचिन वाझे याला पोलीस सेवेत पुन्हा घेण्यास शरद पवारांचा विरोध होता. परंतु, तू दोन कोटी रुपये दे. मी पवारांचे मन वळवतो, असे अनिल देशमुख यांनी मला सांगितले होते. मी पैसे देऊ शकलो नाही. तरीही त्यांनी मला वेळेत पैसे दे असे सांगितले होते, असे सचिन वाजे याने चौकशी दरम्यान सांगितले. अर्थात पवारांच्या संदर्भातील हा दावा सचिन वाझे याने या आधी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App