भारतीय क्रिकेट संघाच्या भावी कर्णधारपदी केएल राहुलला संधी द्यावी – सुनील गावसकर


वृत्तसंस्था

मुंबई: विराट कोहलीच्या जागी आता रोहित शर्मा हा भारताच्या टी -20 संघाचा कर्णधार होण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु महान फलंदाज सुनील गावसकर यांना वाटते की, केएल राहुलला भारतीय क्रिकेट संघाचा भावी कर्णधार म्हणून तयार केले पाहिजे.As the future captain of the Indian cricket team Give a chance to KL Rahul: Sunil Gavaskar

टी -20 वर्ल्डकपनंतर विराट कोहलीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर केएल राहुलकडे कर्णधारपद द्यावे, असे गावसकर यांना वाटते.
सुनील गावसकर म्हणाले की, केएल राहुलकडे कर्णधारपद स्वीकारण्याची क्षमता आहे.गावसकर ‘स्पोर्ट्स तक’ला म्हणाले, बीसीसीआयने भविष्याचा विचार करणे महत्वाचे आहे.



ते म्हणाले, ‘जर भारत नवीन कर्णधार तयार करण्याचा विचार करत असेल तर केएल राहुल त्यासाठी योग्य असू शकतो. त्याने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्येही त्याची फलंदाजी खूप चांगली होती. तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० ओव्हरच्या सामन्यात त्याला उपकर्णधार बनवले जाऊ शकते.

राहुल हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. गावसकर म्हणाले, ‘राहुलने आयपीएलमध्ये अतिशय प्रभावी कर्णधारपद भूषवले आहे. त्याने कर्णधारपदाचा भार त्याच्या फलंदाजीवर पडू दिला नाही. त्याच्या नावाचा कर्णधारपदी विचार केला जाऊ शकतो.

दुसरीकडे, मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली निवड समितीकडे एक प्रस्ताव घेऊन गेला होता. त्यात त्याने म्हंटले, की रोहितला ३४ वर्षांचे असल्याने त्याला वन-डे उपकर्णधारपदावरून काढून टाकावे. एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद केएल राहुलकडे सोपवावे, अशी त्याची इच्छा होती, तर पंतने टी -20 फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

As the future captain of the Indian cricket team Give a chance to KL Rahul: Sunil Gavaskar

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण