मुख्यमंत्र्यांच्या विधानाला रावसाहेब दानवे यांचीही पुष्टी; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या त्रासातून मुख्यमंत्री बोलले असतील!!


प्रतिनिधी

संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “माझे भावी सहकारी” असा उल्लेख करुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जी खळबळ उडवून दिली आहे, तिच्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आणखीन तेल ओतले आहे. Raosaheb Danve also confirmed the statement of the Chief Minister

काँग्रेस राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांना त्रास देत असतील म्हणून ते शिवसेना-भाजपच्या भविष्यातल्या एकत्र येण्यावर बोलले असतील, असे विधान करून रावसाहेब दानवे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाला एक प्रकारे पुष्टी दिली आहे.

काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे विधान, आज मुख्यमंत्र्यांचे विधान आणि त्याला रावसाहेब दानवे पाटील यांनी दिलेली पुष्टी यांची संगती लावली तर त्यातून निघणारा राजकीय अर्थ असाच आहे की शिवसेना-भाजप यांची पुन्हा एकदा एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी.



काँग्रेसवाले जास्त त्रास द्यायला लागले तर मी तुम्हाला बोलून घेईन, असे मुख्यमंत्री मला बाळासाहेब थोरात यांच्यासमोर म्हणाल्याचे रावसाहेब पाटील दानवे यांनी एबीपी माझा न्युज चॅनेलशी बोलताना सांगितले. शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांनी युती करूनच निवडणूक लढवून जिंकली आहे. त्यामुळे एका विशिष्ट घटनेमुळे शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा करून सत्ता मिळवली हे मतदारांना आवडलेले नाही. हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे देखील त्यांनी भविष्यात एकत्र येण्याचे संकेत दिले असावेत, असे रावसाहेब पाटील दानवे म्हणाले.

रावसाहेब पाटील यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय तर्कवितर्क आता शिगेला पोहोचले आहेत. तसेच कदाचित शरद पवार यांनी कोणती राजकीय खेळी करण्यापूर्वी आपण आपली खेळी करून घ्यावी असाही विचार मुख्यमंत्र्यांनी केला असू शकतो, अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Raosaheb Danve also confirmed the statement of the Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात