अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरी आयकर विभागाचे छापे; अनिल देशमुख घरी नव्हते सर्च ऑपरेशन सुरू


वृत्तसंस्था

नागपूर : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार चालकांकडून 100 कोटींची खंडणी वसूल करण्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी आयकर विभागाने छापे घातले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.Income tax department raids Anil Deshmukh’s Nagpur home; Anil Deshmukh was not at home and search operation was started

या छाप्याच्या वेळी अनिल देशमुख, त्यांचे दोन मुलगे घरी नव्हते. अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि काही खाजगी कर्मचारी हेच घरात आहेत. आयकर विभागाचे अधिकारी सध्या घराची झडती घेत असून त्यामध्ये नेमके काय मिळते याची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आजचा आयकर विभागाचा छापा या चौकशीचाच एक भाग आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Income tax department raids Anil Deshmukh’s Nagpur home; Anil Deshmukh was not at home and search operation was started

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण