राजकीय पंडित आणि प्रसार माध्यमांकडून सुप्रीम कोर्टाचा निकाल “परस्पर” जाहीर, पण थोडी वाट तर पाहा; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

Fadanvis new

प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल काही राजकीय पंडितांनी “परस्पर” जाहीर केला आहे. पण सुप्रीम कोर्टाचा खरा निकाल समोर येण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल, अशा खोचक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माध्यमे आणि त्यावर व्यक्त होणारे राजकीय पंडित यांना टोला हाणला आहे.Wait patiently for Supreme Court verdict, don’t “declare” it on your own; devendra Fadanavis tells political pundits and marathi media

ठाकरे – शिंदे सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत आम्ही आशादायी आहोत. आमच्या सरकारला काहीही होणार नाही, असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा यासह अनेक गोष्टींचे भवितव्य अवलंबून असलेला सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. काही मराठी माध्यमांनी हा निकाल उद्याच लागण्याची बातमी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे पण ही सूत्रे नेमकी कोण आहेत आणि सुप्रीम कोर्टात आत मध्ये किती खोलवर त्या सूत्रांची धाव आहे याविषयी मात्र माध्यमांनी मौन बाळगले आहे.



सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याचा दावा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केला आहे. पण शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र शिंदे फडणवीस यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे याकडे आपल्याच आघाडीतल्या नेत्यांचे लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बाजूने सकारात्मक निकाल लागण्याची आशा व्यक्त केली आहे.

सगळे कायद्याच्या चौकटीतच

सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल देण्याआधीच अनेक राजकीय पंडितांनी आणि प्रसार माध्यमांनी परस्पर निर्णय जाहीर करुन टाकला आहे, एवढेच नव्हे त्यावर भविष्यातील राजकीय समीकरणे आणि नव्या सरकारबाबत भाकीते केली आहेत. हा प्रकार योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहिली पाहिजे. आम्ही निकालाबाबत आशादायी आहोत. काहीही प्रतिकूल होणार नाही. आम्ही सगळे कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, ही अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे राजभवनात दाखल

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला अवघे काही तास शिल्लक असताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे शुक्रवारी दुपारी अचानकपणे राजभवनात दाखल झाले. आदित्य ठाकरे राजभवनात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येत्या १५ तारखेपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडून सत्तासंघर्षाचा निकाल येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Wait patiently for Supreme Court verdict, don’t “declare” it on your own; devendra Fadanavis tells political pundits and marathi media

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात