माढ्यात राष्ट्रवादीला फिरवायचीय भाकरी; पण जुन्याच भाकरीला शेक देण्याची तयारी!!


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला फिरवायचीय भाकरी; पण प्रत्यक्षात जुन्याच भाकरीला शेक देण्याची तयारी!!, अशी अवस्था त्या पक्षाची झाली आहे. NCP leaders pitching for loksabha candidature of ramraje naik nimbalkar from madha constituency

कारण विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची तयारी चालवली आहे. त्या संदर्भातली जाहीर वक्तव्ये अजितदादा आणि जयंत पाटील यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार निमित्ताने केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतल्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन रामराजेंच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची मागणी केली, तर शरद पवार साहेब आपल्याला नाही म्हणणार नाहीत, असे वक्तव्य अजितदादांनी त्या समारंभात केले. जयंत पाटलांनी केलेल्या मूळ वक्तव्याला त्यांनी दुजोरा दिला. यातूनच या वक्तव्यांमधून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माढा मतदार संघाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली.



रामराजे निंबाळकर अनुभवी नेते आहेत. 1991 पासून राजकारणात आहेत. फलटणचे नगराध्यक्ष ते विधान परिषदेचे सभापती एवढी त्यांची दीर्घ कारकीर्द आहे. पण राष्ट्रवादीला त्यांच्यापेक्षा दुसरा कोणता तरुण उमेदवार माढा मतदारसंघात सापडत नाही, हीच वस्तुस्थिती त्यांच्या अमृत महोत्सवी सत्काराच्या निमित्ताने पुढे आली आहे.

2023 च्या फेब्रुवारी महिन्यात याच रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे आपले सभापतीपद वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपमध्ये घेण्यासाठी खेटे घालत होते. पण फडणवीसंनी रामराजेंची भाजप मधली एन्ट्री नाकारली, असा दावा माढा मतदारसंघातले भाजपचे विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केला होता.

विधान परिषदेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे बहुमत उरलेले नाही. त्याचवेळी नेमकी रामाजी नाईक निंबाळकर यांची विधान परिषदेच्या सभापती पदाची मुदत संपली आणि त्यांना पायउतार व्हावे लागले. रामराजेंनी सभापतीपद टिकून राहण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते साध्य झाले नाही. त्यामुळेच आता वेगळा मार्ग स्वीकारणे भाग पडून त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी चालविल्याचे जयंत पाटील आणि अजित दादांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

पण हे करताना ज्यांची मूळात 30-35 वर्षांची दीर्घ राजकीय कारकीर्द आहे, त्या रामराजे नाईक निंबाळकर यांना वयाच्या 75 नंतर लोकसभेच्या राण मैदानात उतरवण्याचा राष्ट्रवादीचा मनसूबा म्हणजे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीला भाकरी फिरवायचीय पण जुन्याच भाकरीला शेक देण्याची तयारी!!, असेच राजकीय चित्र यातून निर्माण झाले आहे.

NCP leaders pitching for loksabha candidature of ramraje naik nimbalkar from madha constituency

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात