विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली असलेल्या बँकांच्या संघटना आता व्यावसायिक विजय मल्ल्याकडून ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वसूल करू शकणार आहेत. मुंबईच्या प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग न्यायालयाने बँकांना मोठा दिलासा देत, मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती बँकांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश ‘ईडी’ला दिले आहेत. Vijay Mallya gets in trouble
या आदेशात म्हटले आहे, की ‘ईडी’ने जप्त केलेल्या मल्ल्याच्या मालमत्तेवर स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या संघटनांचा अधिकार आहे. मल्ल्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या मालक आता बँका असतील आणि त्यांचे कर्ज वसूल करण्यासाठी या मालमत्तेचा त्या लिलाव करू शकतील.
मल्ल्याने केलेल्या ९००० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्याच्या जप्त केलेल्या मालमत्तांपैकी काही मालमत्ता या बँकांकडे कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवण्यात आल्या होत्या. अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या मल्ल्याच्या मालमत्तेचा लिलाव करून बँका आता त्यांचे कर्ज वसूल करू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App