वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे २० ऑगस्ट रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांचा हा पहिलाच कोकण दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राणे मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत, अशी माहिती आज भाजप कार्यालयातून देण्यात आली. Union Minister Narayan Rane to visit Konkan from August 20
मुंबई महापालिकेची आगामी निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर या यात्रेची सुरुवात ते मुंबईतून करणार आहे. मुंबईतील राणे यांच्या ताकदीचा फायदा आगामी निवडणुकीत भाजप फायदा घेणार आहे. या संपूर्ण जन आशीर्वाद यात्रेत राणे हे आपले पारंपारिक राजकीय विरोधक शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १९ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. ते २० ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरातून जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ करतील. २१ ऑगस्ट रोजी वसई-विरार येथेही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे. २३ ऑगस्टला दक्षिण रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर नारायण राणे व जन आशीर्वाद यात्रा रवाना होणार आहे. या दिवशी रात्री चिपळूणमध्ये नारायण राणे यांचा मुक्काम आहे.
२४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने यात्रा रवाना होईल. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यानंतर केंद्रीय मंत्री राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री दाखल होणार आहेत. कणकवली येथील ओम गणेश निवास स्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. ता. २६ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा असणार आहे.
नारायण राणे यांच्या दौर्यात यात्रा प्रमुख म्हणून माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांची तर संयोजक म्हणून आमदार संजय केळकर यांची नियुक्ती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App