नारायण राणेंच वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारे ; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

विशेष प्रतिनिधी

सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. राजकीय जीवनामध्ये सभ्यता पाळावी लागते.

नारायण राणेंच वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाचा अवमान म्हणजे संबंध जनतेचा अवमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. Statement of Narayan Rane Stigmatizing the culture of maharashtra : pruthviraj chavhan

एखाद्या संस्थेला पैसे देऊन विदेशी सॉफ्टवेअर विकत घेऊन विरोधी पक्षातील नेते, पत्रकार यांच्यासह नामांकित व्यक्तींची हेरगिरी पिगासेस मार्फत करण्यात आली. हा प्रकार केंद्रातील भाजप सरकार करत असून असल्याचा आरोप त्यांनी केला. हेरगिरी प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  •  राणेंच्या वक्तव्यामुळे राज्याच्या संस्कृतीला काळिमा
  • मुख्यमंत्रीपदाचा अवमान म्हणजे जनतेचा अवमान
  • नामांकित व्यक्तींची हेरगिरी पिगासेस मार्फत
  • हेरगिरीची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत करावी

Statement of Narayan Rane Stigmatizing the culture of maharashtra : pruthviraj chavhan