वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. Union Minister Narayan Rane Jana Aashirwad Yatra
केंद्रात नवनियुक्त मंत्र्यांनी अनुक्रमे नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे ठरविले असून नारायण राणे वगळता अन्य ३ मंत्र्यांनी यात्रा सुरु केल्या आहेत. राणे यांच्या यात्रेला उद्या सुरवात होत आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अशा सहा सभा १९ व २० ऑगस्टला होणार आहेत. भाजप त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. राणे २१ ऑगस्टला वसई-विरार दौऱ्यावर असून ते २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान जनआशीर्वाद यात्रा कोकणात जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे हे शिवसेनेला आव्हान देणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप या यात्रेचा उपयोग करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App