कोरोनाच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे आमने-सामने; तुमची आंदोलने होतात, लोकांचा जीव जातो ;उद्धव ठाकरे; तुम्ही फक्त तुमची दुकाने चालवताय ; राज ठाकरे


प्रतिनिधी

मुंबई / पुणे : महाराष्ट्रातील कोरोनाच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे आमने-सामने आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करताना तुमची आंदोलने होतात आणि लोकांचा जीव जातो. तुम्हाला आंदोलने करायची तर करोनाविरोधी करा. लोकांच्या जीवाशी खेळू नका,Uddhav Thackeray and Raj Thackeray targets each other over corona issues

असा उपदेश विरोधकांना केला आहे, तर सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते मात्र गणेश उत्सव आणि धार्मिक उत्सवांना गर्दीत चालत नाही त्यातून कोरोना होतो, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डॉक्टरांच्या परिषदेला ऑनलाईन संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भाजपसह सर्व विरोधी पक्षांचा समाचार घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा तसेच दहीहंडी व गणेशोत्सव या सणांवरून त्यांनी विरोधकांना घेरले.

मंदिरे उघडण्याची मागणी विरोधक करत आहेत. परंतु त्यामुळे लोकांच्या जीवाशी त्यांचा खेळ होईल याची त्यांना जाणिव नाही. असले खेळ करू नका. राजकारण बाजूला ठेवा, असा उपदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे – पवार सरकारवर टीकास्त्र सोडले. फक्त हिंदू सणांच्या वेळीच कोरोना येतो. सरकारी कार्यक्रमांना गर्दी होते तिथे कोरोना होत नाही. राजकीय नेत्यांच्या सभा चालतात. त्या गर्दीला कधी कोरोना होत नाही.

पण हिंदू सण जवळ आले की लगेच कोरोना डोके वर काढतो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. आपली दुकाने चालू ठेवायची हेच या सरकारचे उद्योग आहेत. जनता मरतेय पण या सरकारचा बरं चाललंय, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ठाकरे – पवार सरकारचा समाचार घेतला.

Uddhav Thackeray and Raj Thackeray targets each other over corona issues

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात