हक्कानी नेटवर्क – तालिबान यांच्यातील हिंसक संघर्षात पाकिस्तानच्या आयएसआयचाच हात; हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान जास्त अनुकूल


वृत्तसंस्था

काबूल – तालिबान्यांना अफगाणिस्तानात सरकार बनविण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद सध्या अफगाणिस्तानात आहेत. ते कथित स्वरूपात तालिबानला सरकार बनविण्यात मदत करीत आहेत.Taliban & Haqqani Network Clash; Pakistani ISI more oprational in fighting between them in Afghanistan; Mullah Baradar Injured In Firing

पण पाकिस्तानच्या या कथित मदतीतूनच हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात सत्तेसाठी हिंसक संघर्ष उडाल्याचे बोलले जात आहे. आणि याच हिंसक संघर्षातून झालेल्या गोळीबारात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरादर जखमी झाला आहे.फैज हमीद हे अफगाणिस्तानात तालिबानला सरकार बनविण्यासाठी मदत करणे तसेच पंचशीर भागात सुरू असलेल्या लढाईचे तालिबानच्या बाजूने संचलन करणे यासाठी आले आहेत, असे सांगण्यात येते. परंतु, प्रत्यक्षात पाकिस्तानची तालिबानपेक्षा हक्कानी नेटवर्कशी जास्त जवळीक आहे. कारण त्या नेटवर्कने काश्मीरमध्ये हल्ले करण्याच्या कारस्थानात पाकिस्तानला मदत केली आहे.

त्यामुळे अफगाणिस्तानातील सत्तेमध्ये हक्कानी नेटवर्कचा वाटा मोठा असावा किंबहुना काबूलवर हक्कानी नेटवर्कचे वर्चस्व असावे, असा पाकिस्तानी लष्कराचा मनसूबा आहे. त्यामुळे फैज हमीद यांची मदत वेगळ्या प्रकारे तालिबानला अडचणीची ठरते आहे आणि प्रत्यक्षात हक्कानी नेटवर्कला मदत करणारी ठरते आहे.

मुल्ला अब्दुल गनी बरादर जखमी

अफगाणिस्तानात तालिबानची सरकार बनविण्याची मशक्कत चालू असताना हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यातच जोरदार हिंसक संघर्ष उडाला आहे. एवढेच नाही, हा संघर्ष एवढा पेटला की हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरदार हा जखमी झाला आहे.

त्याला पाकिस्तानात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. हाच मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबान सरकारचा प्रमुख बनणार होता.
हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यातली ही सगळी लढाई काबूलमधली सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असून तालिबान आणि हक्कानी नेटवर्क या दोन्ही गटांना सत्तेमध्ये प्रमुख वाटा हवा आहे.

कारण काबूल जिंकल्याचा दोन्ही गटांचा दावा आहे. हक्कानी नेटवर्कला अफगाणिस्तानात मध्ययुगातली राजवट आणायची आहे. तर तालिबानला या राजवटीत काही आधुनिक व्यवस्था देखील तयार करायची आहे. यातून हा संघर्ष उडाल्याचे सांगण्यात येत आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये तिथल्या अल्पसंख्याक समूदायाला सामील करण्यास तो अनुकूल होता. पण हक्कानी नेटवर्कचा त्याच्या या सूचनेला विरोध असल्याचे सांगण्यात येते. यातूनच गोळीबार झाला आणि त्यात मुल्ला अब्दुल गनी बरादर हा जखमी झाल्याचे सांगण्यात येते आहे.

Taliban & Haqqani Network Clash; Pakistani ISI more oprational in fighting between them in Afghanistan; Mullah Baradar Injured In Firing

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती