गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही; माझा सण माझी जबाबदारी; सीमा भागातून उद्धव ठाकरे यांना आव्हान आणि खिल्लीही!!


विशेष प्रतिनिधी

बेळगाव : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना लाटेला थोपवण्यासाठी शासकीय योजना म्हणून “माझं घर माझी जबाबदारी” ही योजना आणली. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हिंदू सणांच्या वेळी निर्बंध लादलेत.No ganpati festival no voting; people challenged CM Uddhav Thackeray

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या सीमा भागातून उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यात आले आहे आणि त्यांची खिल्ली देखील उडवण्यात आली आहे.सीमाभागातील निपाणी शहरात अनेक ठिकाणी “सार्वजनिक गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही”, “माझा सण माझी जबाबदारी” अशी मोठ-मोठी पोस्टर्स लागली आहेत.



यामध्ये राजकीय नेत्यांच्या यात्रा, सभा -संमेलने चालतात पण हिंदु सणांवर निर्बंध घातले जातात, अशी टीकाही करण्यात आली आहे. ज्या हिंदू सणांमुळे अनेकांची घरे चालतात, त्या हिंदु सणांवर बंदी का लादत्ता इतर वेळेला कोरोन होत नाही का? राजकीय नेत्यांच्या सभांमधून कोरोना पसरत नाही का?

नेते मंडळी फक्त मतदानाच्या वेळी येतात आणि इतर वेळी निर्बंध लादतात, अशी टीकाही या पोस्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळेच गणेश उत्सव नाही तर मतदान नाही आणि माझा सण माझी जबाबदारी अशी ब्रीदवाक्ये ठळकपणे या पोस्टरवर छापण्यात आली आहेत.

No ganpati festival no voting; people challenged CM Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात