प्रतिनिधी
नवी दिल्ली – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातून नव्याने केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, रावसाहेब पाटील दानवेव यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. पण त्यांची सगळ्या महत्त्वाची भेट झाली ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी. अमित शहा यांनी सहकार मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतल्यापासून ही शहा – फडणवीस या दोन नेत्यांमधील पहिली भेट आहे. Two hour discussion between Amit Shah and Devendra Fadanavis trigers speculatiuons over co oprative fraudes in maharashtra
सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून नंतर पहिल्यांदाच अमित शाह यांची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची चर्चा आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाली. त्याचे तपशील फडणवीसांनी शहांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी अधिक सखोल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर सहकार मंत्रालय नव्याने स्थापन होऊन ते खाते अमित शहा यांच्याकडे आले आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली असून त्यातही साखर कारखान्यांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App