विणेकरी केशव कोलते दांपत्याला महापूजेचा मान; आयुष्यभराच्या सेवेचे सार्थक झालं


विशेष प्रतिनिधी

पंढरपुर : कोरोना प्रादुर्भावामुळे पंढरपूरची आषाढी यात्रा ही प्रतिकात्मक साजरी होत असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे २० जुलै रोजी पहाटे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. त्यांच्या समवेत महापूजेचा मान मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई यांना मिळाला आहे. Keshav Kolte couple got a chance to Worship on the Aashadhi yatra

मानाचे वारकरी असणारे केशव कोलते हे विदर्भातील वर्धा येथील आहेत. त्यांचे वय ७१ आहे. गेल्या वीस वर्षापासून ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. मागील वर्षीपासून वारी नसल्याने महापूजेचा मान विणेकर्‍यांना देण्याचा निर्णय समितीने घेतला होता. केशव कोलते यांची निवड ईश्‍वर चिठ्ठीद्वारे करण्यात आली. यासाठी दोन विणेकरी यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या. यात बापू साळुजी मुळीक यांचाही समावेश होता.

  •  केशवराव कोलते दांपत्याला महापूजेचा मान
  • कोरोनामुळे पंढरपूरची आषाढी यात्रा प्रतिकात्मक
  • केशवराव कोलते हे विदर्भातील वर्धा येथील आहेत.
  • केशव कोलते, त्यांच्या पत्नी सौ. इंदूताई यांना मान
  • पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विणेकरी
  • श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात २० वर्षांपासून सेवा

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात