तब्बल 16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचा टोल बंद


विशेष प्रतिनिधी

पुणे : तब्बल 16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचा टोल बंद करण्यात आला आहे. नाशिक महामार्गावर टोल वसुली करणारे चांडोली व मोशी येथील टोल नाके अखेर मुदत संपल्याने बंद करण्यात आले आहेत.Toll between Nashikphata and Rajgurunagar closed after 16 years and 8 months

नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या तीस किलोमीटर अंतरादरम्यान दोन टोल नाके उभारण्यात आले होते. ते बंद झाल्याने नाशिक फाटा ते खेड पर्यंतचा रस्ता आता टोलमुक्त झाला आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोशी व चांडोली येथील टोल वसुली बंद करण्यात आली.नाक्यावर बसविण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वसुली बूथ देखील बंद करण्यात आले आहेत. नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतचा रस्ता गॅजेटनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

Toll between Nashikphata and Rajgurunagar closed after 16 years and 8 months

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय