नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कारवाई न करण्याचे आदेश

Union Minister Narayan Rane Gets Rilef From Mumbai High court In Comment Against CM Thackeray Case

Union Minister Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या त्या वक्तव्याबद्दल दिलासा मिळाला आहे. राणे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने नाशिकच्या गुन्ह्याप्रकरणी कोणतीही कठोर कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे. पण पुण्याच्या गुन्ह्याबाबत अद्याप दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला होणार आहे. Union Minister Narayan Rane Gets Rilef From Mumbai High court In Comment Against CM Thackeray Case


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या त्या वक्तव्याबद्दल दिलासा मिळाला आहे. राणे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने नाशिकच्या गुन्ह्याप्रकरणी कोणतीही कठोर कारवाई करू नये, असा आदेश दिला आहे. पण पुण्याच्या गुन्ह्याबाबत अद्याप दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला होणार आहे. यानंतर थोड्याच वेळाने नारायण राणे यांनी पत्रकार परिषदही घेतली.

त्यांनी वापरलेले शब्द असंसदीय नव्हते का?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर राणेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही सवाल उपस्थित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच सेनाभवनाबद्दल बोलताना वापरेले शब्द असंसदीय नव्हते का? असे प्रश्न राणे यांनी केले आहेत.

17 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणावर बोलणार नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, काल मी रत्नागिरीतून महाड कोर्टात जाऊन पहाटे पाच वाजता मुंबईत पोहोचलो. महाड आणि मुंबई हायकोर्टात माझ्या बाजूनं निकाल लागला. याचाच अर्थ देशात कायद्याचं राज्य आहे. 17 सप्टेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया असल्यानं त्यासंदर्भात बोलणार नाही. पत्रकारांना त्रास होऊ नये म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. गेले काही दिवस जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना जे काही टीव्हीवर येत होतं त्याची सगळी माहिती मला मिळत होती. काही जण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा उठवतात हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यासंदर्भातही काही बोलणार नाही.

Union Minister Narayan Rane Gets Rilef From Mumbai High court In Comment Against CM Thackeray Case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”