मलाच जेलमध्ये टाकण्याची ठाकरे – पवार सरकारची होती तयारी!!; फडणवीसांचा गौप्यस्फोट


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मौठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असं त्यांनी स्वतः एका मराठी खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितलं आहे. The Thackeray-Pawar government was ready to put me in jail

देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीसंबंधातील प्रश्नाबाबत उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. तसेच मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट या ठिकाणाचे सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होत.अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं, जेणेकरून मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अडकवा, मला जेलमध्ये टाका, अशाच प्रकारचे आदेश ठाकरे पवार सरकारमधले होते. हे सत्य असून आता पोलीस विभागातील कोणालाही विचारा, ते देखील आपल्याला सांगू शकतील.’ देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

एवढंच नाहीतर फडणवीस म्हणाले की, ‘माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. आम्ही पाच वर्षे सत्तेत होतो, तरीही ते असं वागले. मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.

The Thackeray-Pawar government was ready to put me in jail

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण