देवेंद्र फडणवीस – संग्राम थोपटे भेट; थोपटेंचे वैयक्तिक काम की मिशन शिवसेनेनंतर भाजपचे मिशन काँग्रेस??


विशेष प्रतिनिधी

पुणे : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातल्या कार्यक्रमात अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि संग्राम थोपटे यांची भेट म्हणजे थोपटे यांचे वैयक्तिक काम की भाजपचे मिशन काँग्रेस?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Devendra Fadanavis – Congress MLA sangram thopte meeting rise eyebrows in political circles in maharashtra

देवेंद्र फडणवीस आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर संग्राम थोपटे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. एका वेगळ्या काम संदर्भात ही भेट असल्याचा खुलासा थोपटे यांनी केला. परंतु राजकीय वर्तुळात मात्र या भेटीची वेगळीच चर्चा सुरू झाली असून मिशन शिवसेना नंतर भाजपने मिशन काँग्रेस सुरू केले आहे की काय??, अशी ही चर्चा आहे.

संग्राम थोपटे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेले. पण त्याच वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बारामती दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याकडे मात्र थोपटे यांनी पाठ फिरवली. मग थोपटे यांनी हे राजकीय टाइमिंग साधून फडणवीसांकडे काम काढले होते की त्यांना आणखी काही वेगळे साध्य करायचे आहे??, या चर्चेला पुणे जिल्ह्यात हवा मिळाली आहे.

राष्ट्रवादीच्या प्रभावातही थोपटेंचे वर्चस्व टिकून

पुणे जिल्ह्यात इतर सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असताना संग्राम थोपटे यांनी भोर वेल्ल्ह्याचा आपला बालेकिल्ला टिकवून ठेवला आहे. वसंतदादा दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळापासून ते अनेक मंत्रिमंडळांमध्ये काम केलेले वरिष्ठ मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम हे चिरंजीव आहेत. ते स्वतः सलग तीन वेळा भोर वेल्हा मतदार संघातून काँग्रेसचे आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या अध्यक्षपदावर संग्राम थोपटे यांचा दावा होता. परंतु त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी विविध राजकीय खेळ्या करून त्या पदापासून वंचित ठेवले होते. महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिपदाची संधी काँग्रेस मधून मिळू शकली नव्हती.

या राजकीय पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे अस्वस्थ असल्याची चर्चा आहेच. त्यांना मंत्रीपद दिले नाही म्हणून भोर मधल्या 20 नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. संग्राम थोपटे आणि त्यांच्या समर्थकांची राजकीय ही अस्वस्थता आता आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. या भेटीसाठी भाजप आमदार राहुल कुल यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपने संग्राम थोपटे यांच्यामार्फत मिशन काँग्रेस सुरू केले की काय?? अशी राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे.

Devendra Fadanavis – Congress MLA sangram thopte meeting rise eyebrows in political circles in maharashtra

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण