18,000 बसेसचा ताफा असलेल्या एसटी महामंडळाकडे आर्थिक तंगी असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही विलंबाने होत आहे. The ST Corporation has no money for diesel, forcing employees to take leave
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीच्या दुहेरी संकटाने एसटीला वेढा घातला असून आता तर डिझेलसाठीही एसटीकडे पैसे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटी महामंडळ काही फेऱ्या रद्द करत असून त्या बसवरील वाहक व चालकांना सक्तीने रजेवर जाण्यास सांगत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे.
18,000 बसेसचा ताफा असलेल्या एसटी महामंडळाकडे आर्थिक तंगी असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही विलंबाने होत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या या दुरवस्थेचा फटका गावाला जाण्यासाठी रांगेत उभे असलेल्यांना बसण्याची शक्यता आहे.
एसटीमध्ये जवळपास 97,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी केवळ 55,516 कर्मचाऱ्यांचेच लसीकरण करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर आगार व्यवस्थापक लसीकरणासाठी सुटी देत नसल्यामुळे ही प्रक्रियाही मंदावली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे झालेल्या या नुकसानामुळे गेल्या वर्षी महाराष्ट्र परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरटीसील खर्च कमी करण्याचा व राज्यभरात त्याचे कामकाज व्यवहार्य करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App