राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांची आता फक्त काँग्रेसच नव्हे, तर शिवसेनेशीही पंगा घेण्याची तयारी!!


महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगला समन्वय असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी आता काँग्रेस बरोबरच शिवसेनेशीही स्थानिक पातळीवर राजकीय पंगा घेण्याची तयारी चालवली असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या एका वक्तव्यातून ही बाब अधोरेखित होत आहे.
The second tier leaders of the NCP are no longer just the Congress

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसी मधल्या मेळाव्यात संभाजीनगरचे वेगळे नामकरण काय करायचे?? आम्ही औरंगाबादला पहिल्यापासूनच संभाजीनगर असेच  म्हणतो आहोत, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला भाजपने विरोध करणे हे स्वाभाविक होते. पण आता राष्ट्रवादीतून मुख्यमंत्र्यांविरुद्ध वेगळा राजकीय सूर बाहेर निघाला आहे, हे राजेश टोपे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. त्यांनी जालन्यातल्या पत्रकार परिषदेत, औरंगाबादला संभाजीनगर म्हणायला शिवसेनेला आवडत असेल तरवड तर आवडो, पण औरंगाबाद शहराचे नामांतर राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही, असे सांगून टाकले आहे. याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांविरोधात मत व्यक्त केल्याने त्यांची शिवसेनेशी पंगा घेण्याची तयारी दिसून येत आहे.

– जयंतराव – अजितदादांनंतर राजेश टोपे

एरवी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आपापल्या स्टाईलने राजकीय प्रश्नांना उत्तरे राजकीय उत्तरे देत असतात. पण राजेश टोपे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या मताविरोधात मत व्यक्त करून आपणही राजकीय वक्तव्य करण्यात कमी नाही हे दाखवून दिले आहे. यामागे अर्थातच राष्ट्रवादीच्या हायकमांडने बळ असल्याशिवाय त्यांनी असे वक्तव्य केले नसणार हे उघड आहे. पण टोपे यांच्या वक्तव्याचा निमित्ताने शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीतून सूर निघाला आहे, ही बाब सगळ्यात महत्त्वाची आहे.

 

– नानांशी पंगा एकास चार!!

एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उदयपूर मधून “चिंतन बळ” घेऊन आल्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार तोफा डागत आहेत. नाना पटोले यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे शरद पवारांनी आधीच सांगितल्याने ते स्वतः नानांच्या कोणत्याही वक्तव्याला उत्तरे देत नाहीत. पण राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. पवार कुटुंबियांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. मी त्यावर बोलणार नाही, पण काँग्रेस कार्यकर्ते त्यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, या नानांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांच्या पाठोपाठ गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतल्या 4 नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यातच नाना पटोले यांचे पवारांनी कमी केलेले “राजकीय महत्त्व” नेमके किती आहे??, हे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी दाखवून दिले आहे!!

– शिवसेना आणि काँग्रेसने अजून नेते उतरवले नाहीत

या सर्व बाबींचा एकत्रित अर्थ हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडने आपल्या नेत्यांची दुसरी फळी आता शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्या विरोधात स्थानिक पातळीवरच्या राजकारणात उतरवली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हायकमांड मध्ये प्रदेश पातळीवर समन्वय ठेवायचा आणि दुसऱ्या फळीच्या नेत्यांपासून आपापल्या बालेकिल्ल्यामध्ये आपापले पक्ष मजबूत करत राहायचे असे दुहेरी धोरण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे हायकमांड राबवत आहे. पण त्याच वेळी राष्ट्रवादीचे वेगळे धोरण म्हणून एकाच वेळी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी पंगा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची दुसरी फळी आता आघाडीवर येत आहे हेच सध्याच्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होते आहे.

The second tier leaders of the NCP are no longer just the Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात