विशेष प्रतिनिधी
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये संत आणि समाज सुधारक रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. समानतेचा आदर्श असणाºया रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याची उंची 216 असून 11व्या शतकातील संत रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ हा समतेचा पुतळा उभारण्यात आला आहे.The Prime Minister will unveil the statue of social reformer Ramanujacharya today
मानवतेबाबत असणाऱ्या श्रद्धा, जात यांच्यासह जीवनातील अनेक गोष्टींमध्ये त्यांनी समानतेचा विचार मांडला आहे. जगातील ही सर्वात मोठी अशी दोन नंबरची मूर्ती असून हा पुतळा 1800 टनाचा आहे. तर पंचधातूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्ताचा वापर केला आहे.
मंदिर परिसर आणि या पुतळ्याची संकल्पना त्रिदंडी चिन्ना जियर स्वामी यांची आहे.रामानुजाचार्य हे महान सुधारक होते. ज्यांनी 1 हजार वषार्पूर्वी समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला. रामानुजाचार्य यांचा पुतळा म्हणजे समानतेचा पुतळा आहे.
त्याचे अनावरण बुधवारपासून 12 दिवस असणाºया रामानुज सहस्त्राब्दी समारोपप्रसंगी केले जाणार आहे. वैष्णव संत रामानुजाचार्य यांची 1000 वी जयंतीनिमित्त सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत 1 हजार 35 कुंडांतून 14 दिवस महायज्ञाचा कार्यक्रम केला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App