हमीद- मुक्ताने सात कोटी रुपयांचा ट्रस्ट घेतला ताब्यात, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा ७ कोटी रुपयांचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना केला आहे.Hamid-Mukta took a trust worth Rs 7 crore, alleged Avinash Patil, working president of ANNIS

पाटील म्हणाले, हमीद-मुक्ता गटातील ५-१० लोक संघटनेच्या कोणत्याही पदावर नाहीत. आम्ही एन. डी. पाटील यांच्या निधनाच्या दु:खातून सावरत होतो त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीचा संबंध नाही, असंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे.अविनाश पाटील म्हणाले, एन. डी. पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतरच्या दु:खातून आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघटना अजून सावरत होतो. असं असताना आमच्या संघटनेने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या जागेवर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्न येत नाही. असा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही.

येत्या जून २०२२ मध्ये विद्यमान राज्य कार्यकारिणीचा कालावधी संपत आहे. त्यानंतर संघटनेच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. सरोज पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड हमीद- मुक्ता दाभोलकर स्थापित गटाने केली आहे. या निवडीबद्दल सरोज पाटील यांचे मी अभिनंदन करतो.

हमीद-मुक्ता गटाचा डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही या गटाची कार्य पद्धती आहे. या गटात असणारे ५-१० लोक समितीच्या कोणत्याही पदावर नाहीत, पण ते ४ ते ६ महिन्यांतून एखादा कार्यक्रम समितीच्या नावाने घेऊन समिती विरोधात समांतर कार्यपद्धती अवलंबत आहे.

याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकतीच सरोज पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षा म्हणून या गटाने निवड जाहीर करणे आहे. समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे. वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे.

संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या ६० वषार्तील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाºया परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मयार्दा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा.

पाटील म्हणाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेची स्थापना शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने ९ आॅगस्ट १९८९ रोजी झाली. १९८९ ते २००९ पर्यंत डॉ नरेंद्र दाभोलकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते. ते हयात असताना २०१० साली अविनाश पाटील म्हणजे माझी कार्याध्यक्ष म्हणून सवार्नुमते निवड करण्यात आली होती.

त्यानंतर सलग जवळपास एक तप, १२ वर्षे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आलो आहे. १९८९ पासून ते? मृत्यूपर्यंतच्या १७ जानेवारी २०२२ पर्यंत एन. डी. पाटील हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष होते. एका बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाची वेदना मनात असताना, दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते उमेदीने काम करत होते. खुनानंतरच्या ८ वर्षात लोकशाही, विकेंद्रित कार्य पद्धती आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे समितीचे काम दुप्पट वाढले, व्यापक अंगाने विस्तारले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन एके अंधश्रद्धा निर्मूलन या मर्यादेत न राहता समाजातील व्यापक परिवर्तनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न आम्ही यथाशक्ती केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कामाची? दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३० वर्षांच्या संघटनात्मक कार्यपद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने संघटनेने सलग जवळपास ३० वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका नावाचे नवे मुखपत्र सुरू केले. आतापर्यंत या पत्रिकेचे ५ हजारांहून अधिक वाचक सभासद झाले आहेत.

महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी १९९३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. प्रतापराव पवार हे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, त्याच कार्याध्यक्ष पदावर डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच आठवड्यात भावनिक आवाहनाने त्यांच्या पत्नी, डॉ शैला दाभोलकर यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हमीद-मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतलाह्व ह्संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत २५ वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण ७ कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे.

शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले आहे.

अविनाश पाटील यांच्या या आरोपांनंतर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, वैयक्तिक आकसाच्या पोटी केलेले हे धादांत खोटे आरोप आहेत. आम्ही अंनिस ट्रस्टचे विश्वस्त नाही. या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवासखर्च देखील घेतलेला नाही. आम्ही अंनिस चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू. योग्य वेळी आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू.

Hamid-Mukta took a trust worth Rs 7 crore, alleged Avinash Patil, working president of ANNIS

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण