एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा पाहून बाळासाहेबांना दुःख; विनायक मेटे यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका


विशेष प्रतिनिधी

बीड : मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र चालवण्याचा अधिकार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा पाहून बाळासाहेबांना देखील वाईट वाटत असेल, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे-पवार सरकारवर केली. The plight of ST employees Sad to see Balasaheb

गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच काम बंद आंदोलन सुरू आहे. तर बीड मध्ये मागील ४ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला आमदार विनायक मेटे यांनी आज भेट दिली. दरम्यान यावेळी मेटेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र चालवण्याचा काही अधिकार नसल्याचं म्हटले आहे.

दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागतय. त्यामुळे दिवंगत बाळासाहेबांना देखील मराठी माणूस दिवाळीच्या काळात अडचणीत असल्याचे पाहून वाईट वाटत असेल, असे देखील यावेळी विनायक मेटे म्हणाले आहेत. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी एसटी आगारातच काळी दिवाळी साजरी केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आमदार मेटे यांनी यावेळी फराळ वाटप करून केला आहे.

  • एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा; बाळासाहेबांना दुःख
  • आमदार विनायक मेटे यांची सरकारवर टीका
  • उद्धव यांना महाराष्ट्र चालविण्याचा अधिकार नाही
  • दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ
  • एसटी आगारातच काळी दिवाळी साजरी

The plight of ST employees Sad to see Balasaheb

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात