The Kashmir Files – “Thackeray” : “ठाकरे” टॅक्स फ्री केला नव्हता, मग “द काश्मीर फाईल्स” कशाला हवाय टॅक्स फ्री??


  • संजय राऊतांचा सवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा बायोपिक “ठाकरे” टॅक्स फ्री केला नव्हता. मग “द काश्मीर फाईल्स” कशाला हवा टॅक्स फ्री?, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. The Kashmir Files – “Thackeray

“द कश्मीर फाईल्स” या सिनेमावरून देशभरात राजकीय गदारोळ सुरू आहे. काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष “द काश्मीर फाईल्स” या सिनेमातील सत्यावरून अनेक सवाल उठवताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी देखील “द काश्मीर फाईल्स” या सिनेमात “ठरवून वेगळे सत्य” दाखवण्यात आले असल्याचा दावा केला आहे.

– 9 राज्यांमध्ये टॅक्स फ्री

परंतु 9 राज्यांनी “द काश्‍मीर फाईल्स” हा सिनेमा टॅक्स फ्री केल्यानंतर महाराष्ट्रातही तो टॅक्स फ्री करावा, अशी मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र हा सिनेमा केंद्र सरकारने टॅक्स फ्री करावा महाराष्ट्रात तसे करणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा बायोपिक “ठाकरे” टॅक्स फ्री केला नव्हता तरी तो सुपरहिट ठरला. लोक थिएटरमध्ये तो सिनेमा बघायला आले. मग “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा कशासाठी टॅक्स फ्री करायला हवा?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

The Kashmir Files – “Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था