विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : जगात देव असतो आणि तो कधी कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही. कोल्हापूर मध्ये अशीच एक घटना घडली आहे. घरात सावत्र आई व वडील त्रास देत असल्यामुळे इचलकरंजी शहरातून दोन बहिणी घर सोडून बाहेर पडल्या. त्या कोल्हापूर येथील एसटी स्टँडवर घाबरलेल्या अवस्थेत फिरत असताना वेश्याव्यवसाय करणा-या महिलांनी त्यांना गाठले.
The humanity of rickshaw pullers in Kolhapur was saved from being pushed into prostitution
त्या महिला त्यांना बरोबर घेऊन जात आहेत असे स्टॉपवरील रिक्षावाल्यानी पाहिले आणि त्यांनी या मुलींना त्या महिलांकडून सोडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर
कोल्हापूर येथील रिक्षाचालकांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्यापासून वाचल्या. त्या केवळ या रिक्षाचालकांची दक्षता व माणुसकी आहे.
बऱ्याच मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले जाते. त्यांचे अपहरण केले जाते, ऍसिड फेकून चेहरा खराब करू अश्या धमक्या दिल्या जातात आणि जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App