सावरकरांची बदनामी करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना भाजपाकडून ‘जोडे मारो’


प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी केल्याच्या आरोपावरुन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध मुंबई भाजपा प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.Thackeray-Pawar Govt’s Power Minister Nitin Raut in conflict due to his Facebook post on Veer Savarkar

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राऊत यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला. भाजपाच्या या दणक्याने नरमलेल्या राऊत यांनी स्वतःची पोस्ट डिलीट केली, परंतू राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, असे भातखळकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी राऊत यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा अशीही मागणी भातखळकर यांनी यावेळी केली.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी त्यांच्या फेसबुकव खात्यावर सावरकर यांच्या संदर्भात संतपाजनक पोस्ट केली ज्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी झाली असा आरोप आहे. यानंतर सावरकर प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. भातखळकर म्हणाले की महाआघाडीचे सरकार आल्यापासून हे प्रकार वाढले आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत.”

राऊत यांच्या कथित वाद विषय मीडियापर्यंत पोहोचल्यानंतर नितीन राऊत यांच्या कार्यालयातून भातखळकर यांना फोन आल्याचे सांगण्यात आले. “आम्ही संबंधित पोस्ट डिलीट करीत आहोत,” असे त्यांनी सांगितले, अशी माहिती आहे. भातखळकर म्हणाले की फेसबुकवर टाकलेली पोस्ट ही केवळ आक्षेपार्ह नसून सावरकरांची बदनामी करणारी आहे. त्यामुळे राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.

“मंत्री राऊत यांनी याप्रकरणी तात्काळ माफी न मागितल्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा. काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’तून यापूर्वी सावरकरांवर चिखलफेक करण्यात आली. तेव्हाही शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री हातावर हात ठेवून बसले होते. आता तरी त्यांनी कारवाईची हिंमत दाखवावी,” असे आव्हान भातखळकर यांनी दिले.

Thackeray-Pawar Govt’s Power Minister Nitin Raut in conflict due to his Facebook post on Veer Savarkar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण