विशेष प्रतिनिधी
पुणे : ठाकरे परिवारात सुरू झालेल्या हिंदुत्वाच्या शर्यतीत आज राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भर घातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मे महिन्यात अयोध्येचा दौरा करणार आहेत, तर राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येत पोहोचणार आहेत. Thackeray Hindutva Race: Race in the Thackeray family to go to Ayodhya; Aditya’s tour in May; Raj Thackeray on 5th June in Ayodhya !!
पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये अयोध्या दौऱ्याची तारीख त्यांनी सांगितली. 5 जूनला मनसेचे नेते आणि मनसैनिकांसमवेत ते अयोध्येत जाऊन रामलल्ला यांचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याचे तपशील नंतर जाहीर करण्यात येतील.
तसेच 1मे महाराष्ट्र दिन संभाजीनगर मध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेची देखील घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. बऱ्याच दिवसात प्रवास केला नाही म्हणून संभाजीनगरचा दौरा करत आहोत, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले.
त्याच वेळी संपूर्ण देशातल्या जनतेला भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याची तयारी सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुसलमानांना या देशाच्या आणि देशातील कायदा राज्यघटनेपेक्षा आपला धर्म मोठा वाटत असेल तर ते गैर आहे. कायद्याचे सगळ्यांनीच पालन केले पाहिजे. मुसलमानांच्या प्रार्थनेला विरोध नाही, तर भोंग्यांना विरोध आहे. त्यांनी भोंगे उतरवले तर आम्हाला हनुमान चालीसा लावण्याची गरज नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
देशभर रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणूका यांवर काही ठिकाणी दगडफेक झाली. त्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे यांनी आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हाला हातात दगड घेता येतात. पण ते आम्हाला घ्यायला लावू नका, असा इशारा दिला आहे.
1 मे महाराष्ट्र दिनी संभाजीनगर मध्ये मनसेची जाहीर सभा आणि 5 जूनचा राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा या दोनच घोषणा करण्यासाठी राज ठाकरे यांनी आजची परिषद पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दोन-तीनच प्रश्नांना थोडक्यात उत्तरे देऊन त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App