मालेगावच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा दणका; ३ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश


प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावमध्ये आज सायंकाळी सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच या सभेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिला आहे. कारण ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये ३ माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेषत: संजय राऊत हे नाशिकमध्येच असतानाच या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Thackeray faction shivsainiks entered shinde faction before Uddhav Thackeray’s rally at malegaon

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. पण त्यापूर्वीच नाशिकहून ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख शशिकांत कोठुळे यांच्यासह माजी नगरसेविका श्यामला हेमंत दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, प्रभाकर पाळदे यांच्यासह शरद देवरे, शोभा गटकाळ, मंगला भास्कर, शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.


एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का; संजय राऊतांना गटनेतेपदावरून हटवून गजानन कीर्तिकरांची केली नियुक्ती!


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ज्यावेळी संजय राऊत हे नाशिकमध्ये यायचे त्यावेळी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश व्हायचा. त्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असताना पुन्हा ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता स्वतः उद्धव ठाकरे सभेसाठी नाशिकमध्ये येण्यापूर्वीच त्यांना एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे.

Thackeray faction shivsainiks entered shinde faction before Uddhav Thackeray’s rally at malegaon

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!