Maharashtra Assembly Monsoon session 2021 : १२ आमदारांचे निलंबन हा नियोजित कटाचा भाग; देवेंद्र फडणवीस यांनी केली पोलखोल


प्रतिनिधी

मुंबई : १२ आमदारांचे निलंबन हा ठाकरे – पवार सरकारच्या नियोजित कटाचा भाग आहे, असे परखड मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. suspension of 12 MLAs is part of a planned plot; Polkhol by Devendra Fadnavis

ओबीसी आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप लावून सरकारने भाजपाचे १२ आमदार आज निलंबित केले. हवे तर सर्व १०६ आमदार निलंबित करा!! पण, ओबीसी आरक्षण परत मिळण्यासाठी आमचा संघर्ष असाच सुरू राहील, असा निश्चय देखील फडणवीस यांनी व्यक्त केला.देवेंद्र फडणवीस म्हणाले…

– १२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे. तालिका सभापतींना कोणतीही शिवीगाळ भाजपाच्या सदस्यांनी केली नाही. विरोधकांची संख्या कमी केली तर आपल्यावर कमी टीका होईल, असे राज्य सरकारला वाटते. ओबीसी आणि मराठा आरक्षणावर हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे.

– न्यायमूर्ती भोसले समितीने स्पष्टपणे सांगितले की, राज्य सरकारला तत्काळ मागासवर्ग आयोग गठित करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात जे सांगितले, तीच कार्यवाही करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक डेटा तयार करावा लागेल.

– मागासवर्ग आयोग स्थापन करणे हा एकमेव पर्याय असल्याचे ठाकरे सरकारने तयार केलेली समितीच सांगते आहे. पण हे सरकार यासंदर्भात सुद्धा केंद्र सरकारकडे ठराव पाठविते आहे. त्यांना केवळ वेळ काढायचा आहे. नुसती टोलवाटोलवी करायची आहे. त्यांना आरक्षण द्यायचेच नाही!

suspension of 12 MLAs is part of a planned plot; Polkhol by Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर