निलंबित पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, अटक न करण्याचे आदेश, तपासही पोलिसांऐवजी इतर यंत्रणांकडून करण्याच्या सूचना


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करता आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता तपास सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी पोलिसांनी न करता दुसऱ्या तपास यंत्रणेकडे द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. Supreme Court issues relief to Parambir Singh, orders not to arrest him


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना अटक न करता आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता तपास सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांची चौकशी पोलिसांनी न करता दुसऱ्या तपास यंत्रणेकडे द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने सेवेतून निलंबित केले आहे. निलंबनाच्या आदेशाची प्रत परमबीर सिंग यांना मिळाली आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा हा दिलासा दिला नसता तर त्यांना अटक होऊ शकली असती, असे मानले जात होते. याआधी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना 6 डिसेंबरपर्यंत अटकेतून सूट दिली होती. आज (6 डिसेंबर, सोमवार) त्यांची मुदत संपली होती. अशा परिस्थितीत आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परमबीर सिंग यांना अटक न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.



परमबीर सिंग यांच्यावर पाच गुन्हे

परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खंडणी प्रकरणात अटक होण्यापासून संरक्षण दिले होते. त्यावेळी न्यायालयाने परमबीर सिंग यांना हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही दिले होते. अटकेतून सूट मिळण्याची मुदत 6 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर खोटी एफआयआर नोंदवून त्रास दिल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील एका बिल्डरशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अनेकांची नावे दडपण्यास सांगण्यात आल्याचा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांचे म्हणणे न ऐकल्यामुळे त्यांच्यावर अनेक खोट्या आरोपांवर एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांचा छळ करण्यात आला, असा आरोप करत कोर्टाकडून निर्दोष सिद्ध होईपर्यंत त्यांना 14 महिने कोणतेही कारण नसताना तुरुंगात राहावे लागले, असे म्हटले आहे.

Supreme Court issues relief to Parambir Singh, orders not to arrest him

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात