सुपरस्टार रजनीकांत यांना डिस्चार्ज, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण


वृत्तसंस्था

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत  यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातातवरण पसरले आहे. दिपावलीचा सणही रजनीकांत यांना त्यांच्या घरी साजरा करता येणार आहे. Superstar Rajinikanth discharged, joy among the fans

रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा त्शस्त्रक्रिया केली होती. चारच दिवसापूर्वी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता.रजनीकांत यांना चक्कर आल्याने चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान त्यांचे ‘रुटिन चेकअप’ झाले. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांना कार्टोइड आर्टरी रिवास्कुलरायजेश शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. ती शस्त्रक्रियादेखील यशस्वीरित्या पार पडली होती.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी आज रविवारी रजनीकांत यांची भेट घेतली होती. रजनीकांत यांनी तामिळ सिनेमांत आपला दबदबा कायम ठेवला आहे. दिवाळीत त्यांचा आगामी ‘अन्नात्थे’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रजनीकांत यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे.

Superstar Rajinikanth discharged, joy among the fans

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!