विशेष प्रतिनिधी
दुबई : भारताला आता स्वत:च्या नव्हे तर न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात अफगणिस्थानने जिंकावे यासाठी प्रार्थन करावी लागणार आहे. न्यूझीलंडचा अफगणिस्थानने पराभव करणे भारतासाठी आवश्यक आहे. पण त्याचबरोबर भारताला अफगणिस्थानचा पराभव करावा लागणार आहे.India’s hopes of victory over Afghanistan, can only reach the semi-finals if Afgnisthan wins
भारतीय संघाला न्यूझीलंडकडून लाजरवाणा पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यासाठी अफगणिस्थानचा विजय महत्वाचा ठरणार आहे. भारताला विश्वचषकात पहिल्यांदा पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताच्या आता अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाशी लढती बाकी आहेत. या तीनही संघाबरोबर न्यूझीलंडही लढणार आहे.
Cricket World : Good Bye ! श्रीलंकेच्या Lasith Malinga चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्याविरुध्दच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड दोघेही सहज विजय मिळवू शकतात. मात्र, अफगाणिस्तानचा संघ सध्या धोकादायक बनला आहे. तो कोणालाही धक्का देऊ शकतो. अफगाणिस्तानने जर न्यूझीलंडला पराभूत केले, तरच भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असेल. पण दुसरीकडे भारताला अफगाणिस्तानवर विजय मिळवावा लागेल. मात्र हे सर्व फार सोपे नाही. त्यासाठी धावांची गती (रनरेट) महत्वाचा ठरणार आहे. न्यूझीलंडचा रनरेट चांगला आहे.
त्यामुळे जेव्हा लढाई रनरेटवर येऊन ठेपेल तेव्हा न्यूझीलंडच्या पुढे जाण्यासाठी भारताला या तीन सामन्यांमध्ये फक्त विजय मिळवून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर असे घडत गेले तर भारताचा अखेरचा सामना हा नामिबियाबरोबर आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ मोठा विजय मिळवू शकतो. पण त्यासाठी अफगाणिस्तानने न्यूझीलडला पराभूत करायला हवे आणि दुसरीकडे भारताने अफगाणिस्तानला पराभूत करायला हवे.
त्यामुळे भारतासाठी आता अफगाणिस्तानचा संघ महत्वाचा ठरणार आहे. पाकिस्तानचा संघ जवळपास उपांत्य फेरीत पोहोचला आहे. कारण आता तीनपैकी दोन लढती त्यांनी जिंकल्या तरी त्यांच्यासाठी उपांत्य फेरीच दरवाजे खुले होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App