हा देश कुणा एका घराण्याची मक्तेदारी आहे का?
माधवी अग्रवाल
औरंगाबाद : आज सामनातून पुन्हा एकदा थेट भारताच्या पंतप्रधानांवर टीका करण्यात आली. (वारंवार नरेंद्र मोदी यांच्यावर वार करणारी शिवसेना नेहमीच हे विसरते की कधी आपणही मित्र होतो .वर्षानूवर्ष बाळासाहेबांच्या साक्षिने ही मित्रता सुरू झाली होती .) आता खेलरत्न पुरस्काराच्या बदललेल्या नावावरून पुन्हा तेच सामनाने दाखवून दिले आहे अर्थात मोदी द्वेष … STORY BEHIND EDITORIAL: Is this grief setting master Sanjay Raut’s or Shiv Sena’s? Which ‘yes’ or ‘he’ is a political game? Read this special report …
संजय राऊत यांनी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली .या भेटीनंतर संजय राऊत यांनी राहूल यांच्यावर स्तुतीसुमने उधळली .संजय राऊत यांनी अशक्य ते शक्य करून दाखवत कट्टर वैरी असणार्या कॉंग्रेसला सत्तेत सोबत घेतले. तेव्हापासून त्यांना सेटिंगचे उस्ताद (अर्थात राजकीय) म्हण्टले जाऊ लागले.
तर मुद्दा हा आहे की आज परत राऊत यांनी सामनातून थेट आपले कॉंग्रेसप्रेम दाखवले .कदाचित राहूल गांधी लवकरच महाराष्ट्र दौर्यावर येणार असल्याने किंवा नाराज कॉंग्रेसला सत्तेत रोखून धरण्यासाठी म्हणा हवे तर …तसेही राहूल गांधी हे महाराष्ट्रात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि शिवसेनेच्या कामकाजाची पद्धत याबद्दल माहिती घेण्यासाठी येत आहेत अशी चर्चा सुरू आहे …
तर अशी बरचशी उदाहरणं आहेत ज्यातून आपण शिवसेनेच्या भूमिकेबद्दल (पूर्वीच्या) बोलू शकतो .मात्र जास्त खोलात न जाता हा 2009 चा किस्सा वाचा –
मुंबईच्या वांद्रे वरळी सीलिंकबाबतही असाच वाद झाला. अरबी समुद्रावर बांधलेला हा पूल मध्य मुंबईतील वरळीला पश्चिम उपनगर बांद्राशी जोडतो. 2009 मध्ये जेव्हा या पुलाचे उद्घाटन झाले, तेव्हा महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने त्याचे नाव राजीव गांधी असे ठेवले. या नावाला शिवसेनेने जोरदार विरोध केला आणि या पुलाचे नाव स्वातंत्र्य सेनानी सावरकरांच्या नावावर ठेवावे अशी मागणी करण्यात आली. संभाजीनगरचही तेच कदाचित आता (महाराष्ट्र दौर्यानंतर)राहुल गांधी औरंगाबादच्या नामकरणाला पाठिंबा देतील अशी आशा करूया …
असो तर मुळ मुद्दा नामकरणाचा नव्हेच मुद्दा राजकारणाचा आहे .राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे ही लोकभावना आहे राजकारण नाही कारण राजकारण असते तर जरा पुढील माहितीवर नजर फिरवा-
केंद्राच्या योजना
राजीव गांधी – 16
इंदिरा गांधी – 8
जवाहर लाल नेहरू – 4
एकूण – 28
क्रीडा स्पर्धा / ट्रॉफी
राजीव गांधी – 23
इंदिरा गांधी – 4
जवाहर लाल नेहरू – 2
एकूण – 29
शैक्षणिक संस्था/विद्यापीठ
राजीव गांधी- 55 इंदिरा गांधी -21
जवाहर लाल नेहरू -22
एकूण – 98
गांधी कुटुंबीयांच्या नावाने
रस्ते/इमारती/स्मारके -74
वैद्यकीय संस्था/रुग्णालये 39
संस्था/खुर्च्या/महोत्सव 37
शिष्यवृत्ती 15
राष्ट्रीय उद्याने / संग्रहालय 15
विमानतळ/ बंदर 5
जर आपण ही आकडेवारी पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते की बहुतेक योजना गांधी घराण्याच्या नावावर आहेत. या विषयावर भारतीयांचे म्हणणे आहे की हे दुर्दैव आहे की काँग्रेसने गांधी कुटुंबाबाहेर कधीही कोणाला पाहिले नाही. आता जर गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर लोकांना जे खरचं या सन्माना योग्य आहेत शांना आदर दिला जात असेल तर शिवसेनेला काय अडचण आहे? राजकारणच करायचे असते तर या वरील सर्वच नावं बदलण्यात आली असती .
राहिला प्रश्न अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. तर ही माहितीच मुळात अर्धवट आहे स्टेडियमच नाव बदललेलं नाहीच …जरा माहिती घ्या !
मग राजकीय खेळ नेमका कोणता? जो खेळ सत्तेसाठी सेनेने खेळला तो की खेळाला दिलेला उचित सन्मान हा ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’
महत्तवाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App